बेकायदेशीररित्या दारु विक्री करणार्‍या भाजी विक्रेत्यावर कारवाई..
बेकायदेशीररित्या दारु विक्री करणार्‍या भाजी विक्रेत्यावर कारवाई

पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः भाजी विक्रीचा व्यवसाय असूनही त्याच्या आड बेकायदेशीररित्या दारु विक्री करणार्‍या भाजीवाल्या विरोधात खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याच्याकडून देशी दारु जप्त केली आहे.
खारघर वसाहत ही नो लिकर झोन असतानाही खारघर सेक्टर 35 मध्ये रामविलास गुप्ता हे पदपथासमोर भाजी विक्री करत असत आणि मागे खुलेआम दारु विक्री करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या संदर्भात त्या परिसरातील एका सोसायटीने खारघर पोलीस ठाण्यात या संदर्भात लेखी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने खारघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडून 630 रुपयाचा देशी दारुचा साठा जप्त केला आहे.
Comments