पनवेलच्या सराफा बाजारातील नव्या रूपातलं श्री मारुती मंदिर..
पनवेलच्या सराफा बाजारातील नव्या रूपातलं श्री मारुती मंदिर..

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील जोशी आळीतील आणि आताच्या सराफा बाजारातील शेकडो वर्षांपूर्वींचे असलेले मारुती मंदिर प्रसिद्ध नगरसेवक राजू सोनी यांच्या पुढाकाराने नव्या रूपात बांधण्यात आले आहे.
हरी लक्ष्मण जोशी यांच्या मालकीच्या असलेल्या या मारुती मंदिरात उत्तराभिमुखी वरद मारुतीची मूर्ती मंदिरामध्ये आहे. जोशी यांच्या  पूर्वजांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर नव्याने बांधावे म्हणून नगरसेवक राजू सोनी यांनी जोशी यांच्याकडे परवानगी मागितली . याप्रमाणे जोशी यांनी परवानगी दिल्यानंतर तात्काळ राजू सोनी यांनी या मंदिराचे काम सुरू केले. भक्तांचे श्रद्धास्थान असलेलं हे मारुती मंदिर नव्या रुपात तयार झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी बोलताना नगरसेवक राजू सोनी म्हणाले , खूप दिवसापासून माझी इच्छा होती की हे मंदिर नव्याने बांधावे. त्याप्रमाणे आज हे मंदिर बांधले आहे. पनवेल आणि परिसरातील अनेक भक्त या मारुती मंदिरात येतात. मनोभावे मागितलेले अनेकांच्या पूर्णत्वास आले आहे, अशा अनेक आख्यायिका आहेत. त्यामुळे माझ्या हातून हे कार्य झालं त्याचा मला आनंद आहे असे सोनी यांनी सांगितले.

फोटो ः मारुती मंदिर
Comments