शांतिनिकेतन पॉलिटेक्निक कॉलेज कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन संदर्भातील मागण्यांना शिवसेनेचा पाठींबा..
शांतिनिकेतन पोलिटेक्निक कॉलेज कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन संदर्भातील मागण्यांना शिवसेनेचा पाठींबा..
पनवेल वैभव वृत्तसेवा : - 
शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरिष घरत  यांच्या आदेशाने आज दि.२६ फेब्रुवारी २०२२ रोजी न्यू जय भारत शिक्षण प्रसारक मंडळ शांतिनिकेतन पोलिटेक्निक कॉलेज, नविन पनवेल येथील कर्मचाऱ्यांच्या २०१२ पासूनच्या थकित वेतनाचा प्रश्न सुटावा यासाठी चालू असलेल्या आमरण उपोषणात शिवसेना नविन पनवेल शहर ने सहभागी होऊन पाठिंबा दिला. 

शांतिनिकेतन पोलिटेक्निक कॉलेज,नविन पनवेल कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण हे २४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू केले असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अन्यथा आमच्या अंत्यविधीला या, आशा प्रकारे त्यांनी बॅनरद्वारे कॉलेज व्यवस्थापनास सूचित केले आहे.त्यांच्या या उपोषणास शिवसेना नवीन पनवेल ने पाठिंबा दर्शवून त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख यांनी सांगितले.

यावेळी नविन पनवेल शहर संघटिका अपूर्वा प्रभू समाजसेविका चित्रा देशमुख ,युवा सैनिक सिद्देश गुरव आदी उपस्थित होते.
Comments