सकल मराठा समाज खांदा कॉलनी तर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा..
सकल मराठा समाज खांदा कॉलनी तर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा..

पनवेल / वार्ताहर : - 
सकल मराठा समाज खांदा कॉलनी आयोजित दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी खांदाकॉलनी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२२ (वर्ष ५वे) चे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक खांदा कॉलनी या ठिकाणी करण्यात आले होते. सकाळी १०.३० वाजता पनवेल महानगरपालिका उपायुक्त कैलास गावडे व खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कोकाटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शिववंदना करण्यात आली.
सकाळी ११:०० वाजता लाठी काठी प्रत्यक्षित करण्यात आले. दुपारी १२ ते ५:०० या वेळेत खांदा कॉलनी सह पनवेल परिसरातील शिवभक्त , सामाजिक , शैक्षणिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शिवप्रतिमेचे दर्शन घेतले. विविध तरुणांच्या शिवप्रेमी मंडळाच्या बाईक रॅली , सामाजिक , राजकीय क्षेत्रातील शिवप्रेमी ,वेषभूषा करीत लहान बाल गोपाळ  व नागरिकांनी या ठिकाणी उपस्तीती दर्शवली. 
  सायंकाळी ५ ते ६ या वेळेत खांदा कॉलनीतील संत जनाई महिला भजन मंडळाचा " हरिपाठ " गायनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला या वेळी वारकरी संप्रदायातील लोकांनी उपस्तीती दर्शवली. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत पनवेलचे सुप्रसिद्ध नादस्फुर्ती ढोल ताशा पथक यांच्या शिस्तबद्ध खेळ करण्यात आला. या वेळी शिवप्रेमीनी  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज , माँसाहेब जिजाऊ , बाल शिवराय यांच्या रूपातील वेशभूषा करीत पोवाडे गायन चा कार्यक्रम सादर केला.  शिवजयंती साजरी करत असताना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवत छत्रपतींचे विचार जन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत या संकल्पनेतून  रात्री शाहीर विनोद जगदाळे यांनी आपल्या पहाडी आवाजात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले वेळेची मर्यादा पाळत  शिवजयंती उत्सव २०२२ साजरा करण्यासाठी मदत करणाऱ्या समाज बांधव, शिवप्रेमी , पोलीस, महानगरपालिका प्रशासन, पत्रकार , मंडप डेकोरेटर, साउंड सर्व्हिस यांचे आभार मानत  १० वाजता संपूर्ण दिवसभर सुरू असणारा शिवजयंती उत्सव २०२२ चा कार्यक्रम पुढील वर्षी याच जोमाने उत्साहाने करण्याचा निश्चय सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने करण्यात आला.
Comments