शिवसेना आयोजित "व्हॉइस ऑफ पनवेल २०२२" चा आदित्य नीला ठरला विजेता..निमिष वळसंगीकर व निलेश गायकवाड उपविजेते पदाचे मानकरी..

पनवेल / प्रतिनिधी : - शिवसेनेचे महानगर संघटक आणि माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल शहर शिवसेनेच्या माध्यमातून 'व्हॉईस ऑफ पनवेल' नावाची सुगम संगीत स्पर्धा पनवेल तालुका क्षेत्रातील तरुणांसाठी आयोजित केली होती. 

या स्पर्धेचा महाअंतिम फेरी चा सोहळा शनिवार 12 फेब्रुवारी रोजी फडके नाट्यगृहात अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. प्राथमिक फेरीत सव्वाशेहून अधिक स्पर्धक असलेल्या या स्पर्धेतून अंतिम फेरीसाठी सहा स्पर्धक व तीन परफॉर्मर अशा नऊ लोकांची निवड करण्यात आली. निलेश गायकवाड, निमिश वळसंगीकर, उत्कर्ष चंदनशिवे, अक्षता भातणकर, दिव्या अहिरे, आदित्य नीला, प्रशांत ठोंबरे, क्षितीज जाधव अशी अंतिम फेरीतील स्पर्धकांची नावे आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी हे पूर्ण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी एक गीत सादर केले. 

याप्रसंगी उपस्थित शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा वाढदिवसानिमित्त डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. एखाद्या लाइव्ह रियलिटी शो प्रमाणे या अंतिम सोहळ्याचे आयोजन प्रथमेश सोमण व त्यांचे पदाधिकारी यांनी केले. डोळे दिपवणारी रोशणाइ, उत्तम स्टेज डेकोरेशन, बाळासाहेब ठाकरे यांचे 80 फुटी पोर्ट्रेट, व दादर शिवतीर्थ येथील स्मृती स्थळाची प्रतिकृतीही साकारण्यात आली होती. सदर स्पर्धेच्या अंतिम फेरीला पनवेलकरांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला. पुणे येथील मधुरा वेलणकर व पनवेलमधील अनिरुद्ध भिडे यांनी अंतिम फेरीच्या परीक्षणाचे काम पाहिले. अंतिम फेरी तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली. स्पर्धा अतिशय रंगतदार झाली. सदर स्पर्धेमध्ये आदित्य नीला हा व्हॉइस ऑफ पनवेल या खीताबाचा मानकरी ठरला तर निमिष वळसंगीकर व निलेश गायकवाड यांना उपविजेते पद देण्यात आले. 

स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित रसिक प्रेक्षकांनी स्वतः आपले मत टाकून "चॉईस ऑफ पनवेल" या बक्षिसाचीही निवड करण्यात आली. प्रेक्षकांच्या मतांनी विजयी झालेल्या रोनक रामगरीया यास 'चॉईस ऑफ पनवेल' चे बक्षीस देण्यात आले. अत्यंत आकर्षक ट्रॉफी व रोख रक्कम असे बक्षिसांचे स्वरूप होते. या कार्यक्रमात पनवेलमधील नामवंत संगीत शिक्षकांचा मानपत्र देऊन प्रमुख अतिथिं तर्फे सत्कार करण्यात आला. पनवेल मधील सुप्रसिद्ध गानगुरु कै. तळेकर बाई यांच्या नावाने संगीत क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, ज्येष्ठ संगीतकार सलील कुलकर्णी, रायगड जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण, सल्लागार शिरीष बुटाला, शहर प्रमुख प्रवीण जाधव यांसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अत्यंत ग्लॅमरस आणि ग्रँड स्वरूपात आयोजित केलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संकल्पना व संयोजक असणारे महानगर संघटक प्रथमेश सोमण यांच्या सोबत अच्युत मनोरे, राहुल गोगटे, अनिल कुरुघोडे, सुजन मुसलोंडकर, अर्चना कुलकर्णी, अभिजीत साखरे, प्रसाद सोनावणे, अर्जुन परदेशी, प्रदीप माखीजा व आमचे आम्हीच नाट्यसंस्थेचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image