ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू..
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पनवेल : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने पायी चालत जाणारया ईसमास धडक दिली. यात 26 वर्षीय अमीर मालो कांधो (देवीचा पाडा)याचा मृत्यू झाला. आरोपी विरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        अमीर कांधो हा वावंजे-पनवेल रोडवर देवीचापाडा येथून जात होता. यावेळी हायवा ट्रक एमएच 43 वाय 2338 वरील चालकाने त्याच्या ताब्यातील हायवा भरधाव वेगाने चालवली व आमीर याला पाठीमागून धडक दिली. या धडकेत आमिर कांधो याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी हायवा चालक पळून गेला आहे.
Comments