शेकाप महिला आघाडी तर्फे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन..
शेकाप महिला आघाडी तर्फे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन..
"सौ.ममता प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान"
          
पनवेल / प्रतिनिधी : -  ५ फेब्रुवारी २०२२ रोजी शेतकरी कामगार पक्ष कार्यालय खांदा कॉलनी येथे महिलांसाठी "हळदीकुंकू" समारंभाचे आयोजन शेतकरी कामगार पक्ष खांदा कॉलनी  महिला आघाडी व जे. एम.म्हात्रे चॅरेटेबल संस्था यांच्यातर्फे केरण्यात आले. यावेळी महिलांना हळद-कुंकू लावून महिलांना वाण स्वरूपात तुळशी चे रोप देण्यात आले.
       या कार्यक्रमामध्ये खांदा कॉलनी मधील विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या "कर्तृत्ववान महिलांचा सन्मान" जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सौ.ममताताई प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते  करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, नगरसेविका कुसुम  पाटील, शेकाप महिला आघाडीच्या माधुरी गोसावी ,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शशिकला सिंग,अमिता चव्हाण क्रांती ज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष रूपालीताई शिंदे, रत्नमालाताई पाबरेकर उपस्थित होत्या.
           तसेच सध्याच्या कोरोना काळामध्ये महिलांसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून सर्व भगिनींची "आरोग्य संदर्भात रुटीन चेकअप करून रुटीन ब्लड चेकअप वर 50% सवलतीचे कार्ड" भेट देण्यात आले. महिलांच्या आरोग्याविषयी जागृत राहून या सेवा दिल्याबद्दल उपस्थित सर्व महिला वर्गातून सर्वांचे आभार मानण्यात आले.
           तसेच महिलांसाठी आवश्यक त्या "शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे मार्गदर्शन" युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले.खांदा कॉलनी मधील महिलांनी या हळदीकुंकू समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशाप्रकारे  हळदीकुंकू च्या निमित्ताने आरोग्यसेवा आणि शासनाच्या इतर योजना मार्गदर्शन सेवा दिल्याबद्दल उपस्थित सर्व उपस्थित महिलांनी सर्व शेकाप महिला आघाडीचे आभार मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दर्शना भडांगे,निर्मला गुंडरे,किशोरी पाटील,नलिनी जाधव,अश्विनी जोगदंड,प्रिया गलांडे, सारिका लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image