पीर करमअली शहा बाबांचे खा.बारणे यांनी घेतले आशीर्वाद व मोफत आरोग्य शिबिरास भेट..
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची शिवसेना पनवेल शहर आयोजित मोफत आरोग्य शिबिरास भेट..


पनवेल : (अनिल कुरघोडे)  : - पीर करमअली शहा बाबांच्या उरूसा निमित्त मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पीर बाबांना फुलांची चादर अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले.तसेच शिवसेना पनवेल शहर आयोजित आरोग्य शिबिरास भेट दिली. 

सदर शिबीर पनवेल शहर संघटक अबरार मास्टर कच्छी, जमील खान, उपविभाग संघटक जुनेद पवार, उपविभाग प्रमुख सुफियान मुकादम,  शाखाप्रमुख नुरुल्लह वाईकर, यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ९ ते १५  फेब्रुवारी पर्यंत केले आहे. 

शुश्रुशा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रक्त तपासणी, शुगर टेस्ट, सीबीसी, ईसीजी, पल्, एक्स रे, वजन तपासणी यासारख्या तपासण्या करण्यात आल्या. या आरोग्य शिबिरात ५०० हून अधिक लोकांनी लाभ घेतला.शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ. राजेंद्र क्षीरसागर, डॉ. रेश्मा शेख, नर्स साक्षी पाटील, लॅब टेक्निशियन ईश्वरी कल्याणकर आदींनी विशेष मेहनत घेतली

आरोग्य शिबिरास खासदार श्रीरंग बारणे, रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, महानगर संघटक प्रथमेश सोमण, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, सेनेचे अच्युत मनोरे, राहुल गोगटे, अनिल कुरघोडे, सुजन मुसलोंडकर, सनी टेमघरे, बाबूभाई पटेल, शैलेश जगनाडे मा.नगरसेवक लतीफ शेख, आदींनी भेट दिली.
 


Comments