वैश्यवाणी - एक हात मदतीचा तर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा
नवीन पनवेल / प्रतिनिधी : पनवेल येथील वैश्य समाज हॉल येथे वैश्यवाणी एक हात मदतीचा या संस्थेतर्फे हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी अशोक भोपतराव (रायगड जिल्हा वैश्यसमाज अध्यक्ष), श्यामल आंग्रे (रायगड जिल्हा महिला अध्यक्ष), सुनील शेट्ये (पनवेल तालुका वैश्य समाज अध्यक्ष), अंजना मनोरे(पनवेल महिला अध्यक्ष), माधवी चौधरी (कळंबोली महिला अध्यक्ष),विजया चौधरी (कार्यक्रम अध्यक्ष) प्रदीप (बापू) दलाल(अध्यक्ष), योगेश तांबोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पनवेलसह आजूबाजूच्या परिसरातील वैश्यवाणी समाज एकत्र यावा व त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे यासाठी वैश्यवाणी -एक हात मदतीचा तर्फे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले होते. या समारंभाला महिलांची विशेष उपस्थिती होती. वाण देऊन महिलांना सन्मानित करण्यात आले. या समारंभात उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी वैश्यवाणी समाजाने एकत्र यावे यासाठी प्रयत्न करायला हवेत असे सांगितले. तसेच एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम राबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी संस्थापक अध्यक्ष योगेश तांबोळी, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप (बापू) दलाल, उपाध्यक्ष हर्षला तांबोळी, सचिव मयूर तांबडे, सहसचिव अंकिता आंग्रे, खजिनदार विजयकुमार तांबोळी, संतोष चौधरी, दीपक जगे, जयेंद्र शेटे, अभिषेक तांबोळी, कमलेश चौधरी, पंकज तांबडे यांच्यासह अनेकांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोक भोपतराव यांनी मत मांडताना त्यांनी सांगितले की, ज्या वृद्धांना त्यांची मुले सांभाळत नाहीत अशा वृद्धांसाठी आपण एक अनाथाश्रम चालू करणार आहोत अशी या वैश्य वाणी- एक हात मदतीचा या संस्थेची संकल्पना आहे. तीला माझा संपूर्णपणे पाठिंबा असेल शिवाय त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये हेही नमूद केले की, वृद्धाश्रम ऐवजी अनाथाश्रम हे नाव दिला आहे ते नक्कीच सार्थकी ठरेल. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा विजया संतोष चौधरी यांनी आपले मत मांडताना स्त्री विषयीची भूमिका कशी असते याबद्दल उहापोह केला .स्त्री म्हणजे कोणाची तरी माता-भगिनी, बहिण, पत्नी असते. अशा ह्या अनेक भूमिका बजावत असताना आज देखील त्या स्त्रीला म्हणजेच जन्माला येणाऱ्या मुलीला जन्माला येण्यापुर्वीच मारलं जातं. आज खऱ्या अर्थाने स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर आपल्याला चर्चा करण्याची गरज आहे. अशा आणि अनेक विविध पैलूंवर विजया चौधरी यांनी भाष्य केले आहे.