भाजपा नेते बबन बारगजे यांना जननायक पुरस्कार प्रदान..
भाजपा नेते बबन बारगजे यांना जननायक पुरस्कार प्रदान             
पनवेल / वार्ताहर : - रायगड मधील भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते व भटके-विमुक्त आघाडी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांना कुशल नेतृत्व जननायक पुरस्कार - २०२१ आज दादर येथे प्रदान करण्यात आला . गेल्या अनेक वर्षापासून एका गरीब कुटुंबातून मुंबईला नोकरीसाठी आलेला हा व्यक्ती नेहमी जनसामान्यांच्या मागण्यासाठी धडपड करीत असतो. बीडसारख्या ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यांमधून नव्हे तर ऊसतोड कामगाराचा मुलगा मुंबईत येऊन सुरूवातीला वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून आता बेस्टमध्ये अभीलेखक म्हणून काम करीत आहे . परंतु नोकरी बरोबरच समाजसेवा व राजकारण करण्याचा त्यांचा पिंड असल्यामुळे कळंबोली येथे 2005 पासून भाजपाचे काम करीत आहेत . वेगवेगळ्या पदावर काम करत असताना बहुजनांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. पाठीमागे कोणतीही राजकीय शक्ती नसताना राजकारणात उतरून एक आपलं वेगळं नाव प्रकाश झोतात आणण्याचे काम बबन बारगजे यांनी केले आहे . समाजसेवा व राजकारण यामधील सेवाभाव हाच गुण त्यांच्यामध्ये दिसतो , याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने आज दादर येथे त्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . मानपत्र , सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड व कीर्तनकार आणि पत्रकार ह.भ.प शामसुंदर सोन्नर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . या पुरस्काराबद्दल बबन बारगजे यांच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे . भाजपाचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र पवार सहसंयोजक गोविंदा गुंजाळकर तसेच बेस्ट उपक्रमातील त्यांचे सहकारी या सर्वांनी बबन बारगजे यांचे अभिनंदन केले आहे . कळंबोलीतील अनेक स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image