महावितरण कडून शिवजयंतीची जय्यत तयारी,वीज प्रवाह अखंडित राहण्यासाठी साफसफाई..
महावितरण कडून शिवजयंतीची जय्यत तयारी,
वीज प्रवाह सुरळीत राहण्यासाठी साफसफाई 

पनवेल दि.१८ (वार्ताहर)- व्ही के हायस्कूल जवळ असलेल्या आणि शहरातील इतर ठिकाणी  रोहित्र जवळ अस्वच्छता व वेली वाढल्या होत्या. सदर परिसर सहाय्यक अभियंता, टपालनाका शाखा, डी.के.मोरे यांनी सोबत कर्मचारी घेऊन स्वच्छ करून घेतला. 
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमुळे परिसरात कुठेही वीज खंडित होण्याचे प्रकार होऊन नये व या पवित्र दिनी शिवभक्तांचा हिरमोड होऊ नये या करिता युद्ध पातळीवर काम करून घेतले. असल्याचे मोरे यांनी सांगितले. 

       
Comments