पनवेल शिवसेनेतर्फे व्यापारी संघटनांना मराठीत नामफलक करण्यासंदर्भात देण्यात आले निवेदन
पनवेल शिवसेनेतर्फे व्यापारी संघटनांना मराठीत नामफलक करण्यासंदर्भात देण्यात आले निवेदन

पनवेल / प्रतिनिधी : - शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिषदादा घरत यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रविण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील व्यापारी संघटनांना दुकानांच्या पाट्या तातडीने मराठीत करण्यासंदर्भात पत्र देण्यात आली. 

यावेळी ज्वेलर्स असोशिएशनचे चत्तरलाल मेहता, होलसेल संघटनेचे दिनेश मिराणी, रिटेल संघटनेचे पेणकर आणि कपडा असोसिएशनचे राजीव सचदेव आदींची भेट घेऊन सदर निवेदन देण्यात आले. 

या प्रसंगी विधानसभा अधिकारी पराग मोहिते, पनवेल शहर संघटिका अर्चना कुलकर्णी, शैलेश जगनाडे, विभाग संघटक जुनेद पवार, शाखाप्रमुख किसन रौंधळ, शाखाप्रमुख अभिजीत साखरे, विजय शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
Comments