शिवजयंतीनिमित्त क्रियाशील प्रेस क्लब पनवेलतर्फे अन्नदान..
पनवेल: साहिल रेळेकर
तारखेनुसार (शनिवार दि.१९ फेब्रुवारी) शिवजयंतीचा उत्सव पार पडणार आहे. शिवजयंती निमित्ताने क्रियाशील प्रेस क्लब पनवेल तर्फे बोंडारपाडा मोरबे येथे आज दुपारी १२ वाजता गरीब-गरजूंना अन्नदान तसेच फळे व बिस्किटचे वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी क्रियाशील प्रेस क्लब संस्थापक तथा सल्लागार विजय कडू, माजी अध्यक्ष सय्यद अकबर, कार्याध्यक्ष साहिल रेळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिर्के, कोषाध्यक्ष विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख ओमकार महाडिक, सहसचिव असीम शेख यांच्यासहसर्व सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती क्रियाशील प्रेस क्लबचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी दिली.
कोरानाचे संकट अजूनही पुर्णपणे टळलेले नसल्याने कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, यावर्षी १९ फेब्रुवारीला होणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने शिवजयंती उत्सव मंडळांना व नागरिकांना करण्यात आले आहे. कोरानाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाईक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. विविध समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असणारी सेवाभावी संघटना म्हणून क्रियाशील प्रेस क्लब पनवेल या संघटनेचा लौकिक आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील गोरगरीब-गरजूंना क्रियाशील प्रेस क्लब पनवेलच्या माध्यमातून अन्नदान करण्यात येणार आहे.