स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवा नोकरभरतीत प्रवेश देण्यात यावा - शिवसेना संघटक भरत पाटील

स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवा नोकरभरतीत प्रवेश देण्यात यावा - शिवसेना संघटक भरत पाटील

पनवेल (विशेष प्रतिनीधी) महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी धोरणानुसार , शासनाच्या सरळ सेवा भरतीमध्ये काही प्रमाणामध्ये मध्ये  राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय खेळाडू / पोलिसांची मुले , सरळ सेवा भरतीसाठी निश्चित करणेत आलेली आहेत . त्याचप्रमाणे शासनाच्या सिडको अथवा स्थानिक स्वराज्य संस्था प्रामुख्याने महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व निमशासकीय प्रकल्पामध्ये सरळ सेवा भरतीसाठी शासकीय नियमानुसार स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवा भरतीमध्ये टक्केवारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी शिवसेना पनवेल तालुका संघटक भरत पाटील यांनी लेखी निवेदनाने महसुल विभाग आयुक्त कोकण भवन यांच्याकडे केली आहे.
 
शासनाने रायगड, ठाणे जिह्यात प्रकल्प उभे करताना येथील शेतकऱ्यांना भूमिहीन केले, बेघर केले आहे. त्यांना उदरनिर्वाह करणारे साधनच हिरावून घेतले आहे. या बाधित प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत प्राधान्य देण्यात येईल, अग्रहक्काने नोकर भरतीत सामावून घेणे शासन कटीबध्द आहे . मोर्चे, आंदोलने झाली की वारंवार सांगितले जात आहे, प्रकल्पग्रस्तांची नावे तालुक्यात / जिल्हयात सेवा योजना कार्यालयात अथवा समाजकल्याण खात्यातर्फे सरळ सेवा भरतीसाठी नांवाची शिफारस केली जाते . पण प्रकल्पग्रस्तांची नोकर भरती केलीच जात नाही असा प्रकल्पग्रस्तांना व संघटनेचा अनुभव वाईट आहे
रायगड, ठाणे जिल्ह्यातील ९५ गावातील 
ज्या शेतकऱ्यांच्या जागेवर सिडकोचा घरांचा प्रकल्प उभा आहे. त्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नाकारण्यात आले आहे. शासकीय व खाजगी प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीमध्ये ८० % टक्के प्राधान्य व २० % टक्के मध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्राधान्य तसेच तृतीय व चतुर्थ श्रेणीमध्ये १०० % टक्के प्रथम प्राधान्य देणे आवश्यक, बंधनकारक असताना नोकरीत सामावून घेतले जात नाही. तेव्हा भूमिहीन, बेघर केलेल्या प्रकल्पग्रस्तांना  रायगड – ठाणे जिल्हयातील , सिडको , महानगरपालिका , एम.आय.डी.सी , रेल्वे , नवी मुंबई विमानतळ , मेट्रो रेल्वे व इतर खाजगी प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या नोकर भरतीमध्ये सरळ सेवा प्रवेश दयावा अशी महत्वपूर्ण अट अस्तित्वात असलेल्या व येणा-या उद्योजकांवर बंधनकारक करणेत यावी जेणे करून रायगड व ठाणे जिल्हयातील प्रामुख्याने पनवेल – उरण, बेलापूर तालुक्यातील अनेक प्रकल्पग्रस्तांच्या घरात चुली पेटतील.
आज या स्थानिक प्रकल्पग्रस्त यांची दयनीय परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे रोजगारभिमूख कामे व इतर व्यवसाय करण्यांची संधी उपलब्द करून देणे आवश्यक व गरजेचे असून नोकर भरतीमध्ये सरळ सेवा प्रवेश व रोजगारभिमूख कामे याबाबत योग्य ते मार्गदर्शनही करण्यात यावे अशीही विनंतीही पनवेल तालुका संघटक भरत पाटील यांनी महसूल विभगिय कोकण आयुक्त विलास पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.
Comments