गुन्हेगारास खारघर पोलिसांनी आवळल्या मुसक्या..
सायन पनवेल महामार्गावर जबरी चोरी करणार्‍या गुन्हेगारास खारघर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पनवेल, दि.21 (संजय कदम) ः खारघर वसाहत परिसरात असलेल्या सायन-पनवेल महामार्गावर जबरी चोरी करणार्‍या गुन्हेगारास खारघर पोलिसांनी ताब्यात घेेवून त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अनिलकुमार श्रीरामफल , वय 30 वर्षे यांचे ताब्यातील टेम्पो क्र डीपी 01 अ 9042 घेवून जात असतांना त्यांनी खारघर टोलनाक्या जवळ रस्त्याचे बाजुला टेम्पो उभा करून टायर चेक करत असताना अनोळखी आरोपीत यांनी रिक्षातुन येवुन फिर्यादीचे टेम्पो समोर थांबुन टेम्पो चालकास शिवीगाळ व दमदाटी करून त्याचे हातातील एमआय रेडमी न्ड्रॉईड कंपनीचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीने एका आरोपितास पकडले त्यावेळी फिर्यादी हे मोबाईल सोडत नाही हे पाहून फिर्यादीचे हातावर चाकुने सपासप वार करून मोबाईल जबरीने चोरून नेल्याने दिलेल्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर नमुद गुन्हयातील आरोपीताबाबत कोणताही ठोस पुरावा नसताना कौशल्यपुर्वक तांत्रिक तपास करुन यातील आरोपी अब्दुलहक सब्रुद्दीन खान वय 24 वर्षे यास गोवंडी कमलानगर, मुंबई येथुन अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचे तपासात आरोपीकडुन फिर्यादीचा चोरी केलेला 10,000 / - रू किंमतीचा मोबाईल व गुन्हा करण्यासाठी वापर केलेली रिक्षा असा एकुण 1,60,000 / - रू किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आले आहेत. सदरची कामगीरी पोलीस आयुक्त  बिपिन कुमार सिंह, पोलीस सह. आयुक्त जय जाधव, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, परिमंडळ 2, पनवेल, भागवत सोनवणे, सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभाग , नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि  संदिपान शिंदे, सपोनि मानसिंग पाटील, पोउपनिरी शिरीष यादव, पोहवा बाबाजी थोरात, पोना प्रशांत जाधव, पोना धनवटे, पोशि शिंगाडे, पोहवा वैद्य यांनी केलेली आहे . सदर गुन्हयाचा तपास खारघर पोलीस ठाणेमार्फत चालु आहे.


फोटो ः खारघर पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल
Comments