सकल मराठा समाज रायगड तर्फे पेण येथे तातडीच्या बैठकीचे आयोजन..
सकल मराठा समाज रायगड तर्फे पेण येथे तातडीच्या बैठकीचे आयोजन

पनवेल दि.१७ (वार्ताहर)- मराठा समाजाच्या प्रलंबित  मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे स्वतः 26 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यासाठी बसणार आहेत. 
       
आपल्या रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी तयारी करण्यासाठी रायगड जिल्ह्याची बैठक रविवारी दि .20 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता मराठा समाज हॉल ( पेण खोपोली बायपास रोड आंबेगाव )पेण येथे होणार आहे तरी प्रत्येक तालुक्यातील प्रमुख 5/6 समन्वयक हजर रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक विनोद साबळे यांनी केले आहे.
Comments