छत्रपती शिवाजी महाराज जयंती पनवेल शहर महावितरण उपविभाग येथे उत्साहात साजरी..

छत्रपती शिवाजी महाराज जयंती पनवेल शहर  महावितरण उपविभाग येथे उत्साहात साजरी
पनवेल / ( अनिल कुरघोडे )  : -  छत्रपती शिवाजी महाराज जयंती पनवेल शहर महावितरण उपविभाग येथे उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवरायांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली तसेच शिवरायांचा जयघोष करण्यात आला.  

थोर महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महावितरण कंपनी ग्राहक सेवेसाठी सदैव तत्पर असते. तसेच सर्व कर्मचारी सुद्धा आपलेच आहेत. आपल्या सोबत सेवेसाठी असल्याचे सहाय्यक अभियंता डी के मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

याप्रसंगी सहाय्यक अभियंता किरण चौधरी, सहाय्यक अभियंता मंदार सावंत, यंत्रचालक भोसले, इतर कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Comments