आरवी एंटरटेनमेंटच्या वतीने इंडियाज फॅशन लीग 2022 चे आयोजन ; श्रेयस तळपदे सह दिग्गज सेलिब्रिटीज राहणार उपस्थित..
आरवी एंटरटेनमेंटच्या वतीने इंडियाज फॅशन लीग 2022 चे आयोजन ; श्रेयस तळपदे सह दिग्गज सेलिब्रिटीज राहणार उपस्थित
जळगावातील शास्त्री दाम्पत्याची फॅशन विश्वात भरारी

पनवेल / वार्ताहर : - जळगावच्या शास्त्री दांपत्याने आरवी एंटरेनमेंट या बॅनर खाली इंडियाज फॅशन लीग 2022 या इव्हेंट चे आयोजन केले आहे.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाशीच्या फोर पॉईंट हॉटेलमध्ये हा सोहळा रंगणार आहे.श्रेयस तळपदे सह दिग्गज सेलिब्रिटीज या फॅशन शो साठी उपस्थित राहणार आहेत. या फॅशन इव्हेंट चे आयोजक डॉक्टर विजय शास्त्री आणि रुपा शास्त्री यांनी या कार्यक्रमाचे बाबत गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी माध्यमांना अवगत केले.
        रूपा शास्त्री या स्वतः फॅशन मॉडेल असून या क्षेत्रात अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे. त्या म्हणाल्या की या क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यातील उणिवा भरून काढण्याच्या उद्देशाने आम्ही इंडियाज फॅशन लीग 2022 चे आयोजन करत आहोत. त्यानिमित्ताने अनेक होतकरू व या क्षेत्रात येण्यासाठी धडपडत असणाऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. जळगाव सारख्या ठिकाणाहून करियर मध्ये प्रवास सुरु केला तेव्हापासून मनामध्ये हेच उद्दिष्ट ठेवले आहे. सुप्रसिद्ध फॅशन कोरिओग्राफर तसेच सेल्फी किंग देव अग्निहोत्री यांच्या ठेक्यावर रंगणारा रॅम्प वॉक निश्चितच उपस्थितांना अत्युत्तम कार्यक्रमाची पर्वणी देऊन जाईल असे शास्त्री दांपत्याने सांगितले. नवी मुंबई मधील कार्यक्रमानंतर मुंबईमध्ये न भुतो न भविष्यती असा कार्यक्रम करणार असल्याचे डॉक्टर विजय शास्त्री यांनी सांगितले परंतु मुंबईच्या कार्यक्रमाचे आयोजनाबाबत ची गुपिते त्यांनी गुलदस्त्यात ठेवली.
लाईव्ह स्ट्रीमिंग च्या माध्यमातून नवी मुंबईसह संपूर्ण राज्यातील लोकांना हा कार्यक्रम लाइव्ह बघता येणार असल्याचे रूपा शास्त्री यांनी सांगितले. हा कार्यक्रम करत असताना गरजवंतांना आपण मदतीचा हात दिला पाहिजे या प्रामाणिक भावनेतून आम्ही फॅशन शो ऑर्गनाईज करत असल्याचे डॉक्टर विजय शास्त्री यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की अर्थार्जन करण्याचा किंवा नफा कमावण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही.
      प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना मंचकावरती डॉक्टर विजय शास्त्री, रूपा शास्त्री,देव अग्निहोत्री, यश शेलार,सूरज कुटे,मिलिंद राणे उपस्थित होते.
Comments