पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात 1 ठार 3 जखमी..
पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात 1 ठार 3 जखमी

पनवेल, दि.17 (संजय कदम) ः पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 1 ठार व 3 जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील पळस्पे परिसरात घडली आहे.
पनवेल जवळील पळस्पे येथील शिरढोण गावाच्या हद्दीत असलेल्या साईकृपा हॉटेल जवळ गोवा-मुंबई महामार्गावर ट्रक क्र.एमच-05-के-9309 वरील चालक मासुम नुरमोहम्मद करबेलकर (27) याने त्याच्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून त्याच्या ट्रकच्या पुढे चालत असलेल्या ट्रेलर क्र.एमएच-48-एवाय-7048 यास पाठीमागून धडक देवून बाजूने देत असलेल्या इको कार क्र.एमएच-06-सीडी-2386 या धडक मारुन झालेल्या अपघातात नितीन भोंगे (24) व जयराम रावते हे किरकोळ जखमी झाले आहेत.  तसेच त्यांच्या ट्रक केबिनमध्ये झोपलेला यशवंत सोनजी फडवले (27) हा गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसर्‍या घटनेत पळस्पे फाटा येथे ट्रक क्र.एमएच-12-एमएक्स-2395 ने एमएच-01-बीयु-9779 या गाडीस धडक दिल्याने या गाडीतील एक जण जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. 

फोटो ः अपघातग्रस्त वाहन.
Comments