कुबेर मोटर्स शोरुमच्या कर्मचार्‍यांनी केली १ लाख १४ हजार रुपये किंमतीची फसवणूक..
कुबेर मोटर्स शोरुमच्या कर्मचार्‍यांनी केली १ लाख १४ हजार रुपये किंमतीची फसवणूक

पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः पनवेल जवळील करंजाडे येथील कुबेर मोटर्स शोरुममध्ये काम करणार्‍या इसमांनी गाडी खरेदी करणार्‍या इसमाची जवळपास 1 लाख 14 हजार 205 रुपयाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
संतोष नाईक (45) यांनी करंजाडे येथे कुबेर मोटर्स शोरुममधून 83 हजार रुपये किंमतीची होंडा शाईन दोन चाकी गाडी घेण्यासाठी तेथे गेले असता त्यांच्याकडून 60 हजार रुपये रोख रक्कम घेतली गेली व राहिलेल्या रकमेचे लोन करून देतो असे सांगून त्यांच्या नावे एकूण 1 लाख 14 हजार 205 रुपयाचे लोन पास करून सदरची रक्कम त्या ठिकाणी असणार्‍या 3 ते 4 कर्मचार्‍यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरुन संतोष नाईक यांची फसवणूक केली आहे. तसेच अशा प्रकारे तेथील कर्मचार्‍यांनी 30 ते 40 लोकांची फसवणूक केली असल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments