‘ए मेथड इन मल्टीशेड’: भारतीय कलात्मक सिनेमा क्षेत्रातील गौरव ठाकूर या उगवत्या तार्‍याचा नवा कलाविष्कार ..
‘ए मेथड इन मल्टीशेड’: भारतीय कलात्मक सिनेमा क्षेत्रातील गौरव ठाकूर या उगवत्या तार्‍याचा नवा कलाविष्कार 
      
भारतातील मोजक्या कलात्मक सिने दिग्दर्शकांच्या यादीत जोडलं गेलं आणखी एक मराठी नाव

पनवेल / प्रतिनिधी : - भारतीय चित्रपट सृष्टीत कलात्मक सिनेमांचं (Art Films) एक आगळं-वेगळं स्थान आहे. या चित्रपटांचे देशविदेशात करोडो चाहते आहेत. मागील दशकापासून तर मुख्य प्रवाहातील मसालेपट पाहणारा सिनेरसिकही या चित्रपटांकडे वळू लागला आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हटलं की त्यात प्रामुख्याने सत्यजित रे, श्याम बेनेगल, केतन मेहता, विजया मेहता, जब्बार पटेल ते नव्या पिढीच्या नागेश कुकुनूर, जानु बरूआ, आनंद गांधी, अनुराग कश्यप आदी दिग्दर्शकांची नावं आपल्यासमोर पटकन येतात. याच पठडीत आता आणखी एक मराठी तरुणाचं नाव जोडलं गेलंय. पनवेल-नवी मुंबईतील २८ वर्षीय सिने-दिग्दर्शक गौरव हृषिकेश ठाकूर याने लिओनोव्ह प्रॉडक्शन सोबत ‘ए मेथड इन मल्टीशेड ‘A Method in Multishade’ या हिन्दी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दीड तासांच्या या चित्रपटाची कथा व पटकथा ही कला चित्रपटांच्या क्षेत्रातील मैलाचा दगड ठरू शकेल अशीच आहे. डायरेक्टर गौरव ठाकूर याने दिग्दर्शनासोबत ही जबाबदारीही सक्षमपणे पेलली आहे. 
मिथुन रामधरणे व आकांक्षा मुंढे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून पदार्पणातच दोघांनी आपल्या अंगभूत अभिनय कौशल्याची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे सक्षम छायाचित्रण. साईराज बटाले या नव्या दमाच्या सिनेमॅटोग्राफरने हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. या चित्रपटातील कलाकार हे प्रामुख्याने पनवेल व नवी मुंबई परिसरातील असून ५५ जणांच्या या चमुसोबत जवळपास १५ तंत्रज्ञांना एकत्र घेत २८ दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. पॅनोरोमा स्टुडिओज या चित्रपट वितरण क्षेत्रातील नामांकित कंपनीने चित्रपटाच्या वर्ल्ड वाईड वितरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. २० डिसेंबर २०२१ रोजी हा चित्रपट गूगल प्ले, आय ट्यून्स व अॅपल टीव्ही या ओटिटी प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून जगभर प्रदर्शित करण्यात आला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पदार्पणाच्या एका आठवड्यातच गूगल प्ले वर नवीन चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट दुसर्‍या स्थानीही पोहोचला.

गौरव ठाकूर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने या आधी जवळपास २१ लघुपट(Short films) तयार केले असून नवी मुंबईतील लोकमान्य टिळक कॉलेज मधून मास मीडिया चे शिक्षण पूर्ण केले आहे. “बालपणापासून चित्रपट क्षेत्रातचे वेड माझ्या नसानसांत भिनलेले होते. त्याला योग्यरित्या वाट मोकळी करून देण्यामध्ये महत्वाचा पाया रचला तो माझ्या आई-वडिलांनी. आणि पुढे यावर कळस चढवण्यात वेळोवेळी योगदान दिले ते माझ्या मित्रपरिवार कम टीम ने” असे गौरव आवर्जून म्हणतो.
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image