कळंबोलीतील उद्यानात जाळला जातो कचरा ; आजूबाजूचे रहिवाशी त्रस्त अधिकार्यांचे दुर्लक्ष
कळंबोली (दीपक घोसाळकर) : कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ६ मधील उद्यानातील जमा केलेला कचरा हा उचलला जात नाही.कचरा एकत्रित करून उद्यानातच त्याचे ठीक रचले जात आहेत. रचलेले कचऱ्याचे ठीग चक्क उद्यानात जाळले जात आहेत. उद्यानात कचरा जाळला जात असल्याने त्याच्यात धुराचे लोट आजूबाजूच्या रहिवाशांच्या नाकातोंडात घुसत असल्याने येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या उद्यानामधील उद्यानात हव्या असणाऱ्या कोणत्या सुविधा व्यवस्थित रित्या नाहीत . संबंधित अधिकारी या नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील रहिवाशांनी संताप व्यक्त करून सिडको अथवा महापालिकेने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे .उद्यानाच्या भिंती लगतच राहणारे समाजसेवक स्वप्नील घाडगे यांनी याबाबत सीडको प्रशासनाला कळूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे.
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ६ मध्ये सिडकोचे उद्यान आहे .या उद्यानामध्ये झाडांचा पडलेला पालापाचोळा हा गेल्या अनेक महिन्यापासून तेथे जमा केला जात आहे व त्याचे दोन ठिकाणी रचून ठेवलेले आहेत.चार दिवसापासून या साठलेल्या कचऱ्याच्या आग लावून जाळण्याचा अनोखा प्रकार केला जात आहे. या उद्यानावर संबंधित अधिकाऱ्यांचे कोणतच लक्ष नसल्याने संबंधित ठेकेदार या उद्यानात नागरी सुविधा देत नसल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. उद्यानामध्ये दोन ठिकाणी कचऱ्याच्या राशीला आग लावून त्याची विल्हेवाट उद्यानातच लावण्याचा प्रकार केला जात आहे. या कचऱ्याच्या राशीमधून बाहेर पडणाऱ्या धुराचा लोट बाजूचा रहिवाशांच्या घरात घुसून त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे .

या उद्यानात सिडकोचा सुरक्षारक्षकही नाही. येथे असणारे विजेचे दिवे बहुतेक बंदच आहेत तर सुरक्षारक्षक गायब आहे .येथील कचरा रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर जळत असल्याने त्याचा धूर आजूबाजूच्या नागरी वस्तीत घुसत असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना होत आहे .या उद्यानाच्या बाजूलाच असलेल्या सोसायटीमध्ये स्वप्निल घाडगे हे सामाजिक कार्यकर्ते राहत असून त्यांनी याबाबत सिडको अधिकार्यांना कळवूनही त्याची साधी दखलही अधिकारी घेत नाहीत. एक प्रकारे ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार येथील अधिकारी करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत .या बाबतचे व्हिडिओ चित्रीकरण व फोटो कळंबोली चे वसाहत अधिकारी विलास बनकर यांना पाठवून त्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की मी उद्या त्याची पाहणी करतो असे ते म्हणाले. नागरी सुविधा महापालिकेकडे की सिडकोकडे याची टोलवाटोलवी अधिकारी वर्ग करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यास अडचण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.