सावित्रीबाई फुले व्यवसायिक कल्याणकारी व दिव्यांग संघटनेच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी..
सावित्रीबाई फुले व्यवसायिक कल्याणकारी व दिव्यांग संघटनेच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी..

पनवेल वैभव / प्रतिनिधी (दि. ४)  :-  स्त्री शिक्षणाचे उद्धारक, माता सावित्रीबाई फुले यांची जयंती, "सावित्रीबाई फुले व्यवसायिक कल्याणकारी व दिव्यांग संघटना" यांच्या वतीने साजरी करण्यात आली. महिला शिक्षणासाठी आपले सारे आयुष्य वेचलेल्या समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज भुजबळ, अजय बहिरा यांच्या हस्ते पनवेल एस. टी. स्टँड जवळ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याप्रती स्मृती जागवून त्यांनी केलेल्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीची  तसेच त्यासाठी त्यांनी वेचलेले संपूर्ण आयुष्य  याची माहिती सांगून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. त्याचप्रमाणे संघटनेचे कौतुक करताना संघटनेने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने  ५१ रोपे लावून त्याचे संगोपन करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांचे नगरसेवक मनोज भुजबळ यांनी अभिनंदन केले.

यावेळी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष कीर्तिकर, उपाध्यक्ष गजेंद्र अहिरे, रायगड जिल्हा अध्यक्ष राजू बोदडे,  श्री भोसले , श्री गुर्जर, खंडू लहाने,  किरण वाहुळकर,  रवी गरड, संजय जाधव, अब्दुल शेख, सलीम शेख इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. 

Comments