सामाजिक वसा हा आपल्याला एकत्र बांधणारा धागा आहे ; तहसीलदार विजय तळेकर...
सामाजिक वसा हा आपल्याला एकत्र बांधणारा धागा आहे ; तहसीलदार विजय तळेकर
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे पत्रकार दिन संपन्न 

पनवेल/प्रतिनिधी
आपत्ती काळात लोकप्रतिनिधी, प्रशासनाने लोकांना मदत केली त्यात पत्रकारांचा खारीचा वाटा आहे. ध्येयाच्या पलीकडे जाऊन आणि पत्रकारितेचा वसा जो घेतला आहे त्याच्या पलीकडे जाऊन पत्रकारांनी मदत केली त्यामुळे सामाजिक वसा हा आपल्याला बांधून ठेवणारा धागा आहे असे मत पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी व्यक्त केले. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती आयोजित पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पनवेल महापालिकेचे  विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उद्योजक राजू कोलकर, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष गणेश कोळी, सय्यद अकबर, मनसेचे पनवेल शहर अध्यक्ष संजय मुरकुटे आणि समितीचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक निलेश सोनावणे आदी उपस्थित होते. 
तहसीलदार विजय तळेकर पुढे म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले तर त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन हे मासिक सुरु केले. ही दोन नावे  आजही  लागू पडत आहेत. काय दाखवायचे आणि कसे मार्गदर्शन हे पत्रकारांच्या हातात असते हे दोन्ही अंगिकारले तर आजचा दिवस सार्थकी लागला असे म्हणता येईल. आजही स्पर्धा परीक्षांमध्ये वृत्तपत्रांचे अग्रलेख वाचण्यास सांगितले जाते. त्यामुळे चहुबाजूने विचार करता येतो. चांगल्या बाबतीत पनवेलच्या लोकांमध्ये एकी असते. सामाजिक वृत्तीतून आपण पुढे जात आहोत. प्रत्येक क्षेत्रात सगळी चांगली लोक भेटतीलच असे नाही, पण ज्याच्याकडे चांगला गुण आहे त्याचे संवर्धन करून पुढे गेले पाहिजे. जेथे प्रशासनाचे चुकते ते दाखवून देण्याचे काम पत्रकार करत असतात. हे काम त्यांनी असेच सुरु ठेवावे असे त्यांनी शेवटी सांगितले. 
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी पत्रकार आणि पोलिसांचे जीवन एकसारखेच असल्याचे सांगत. पत्रकार व पोलीस करत असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक फार कमी वेळा केले जाते. पनवेलच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचाही फार मोठा वाटा आहे. राजकारण, समाजकारणात काम करत असताना पत्रकारांशी संबंध येत असतोच. पनवेलमधील पत्रकार नेहमीच चांगल्या कामाला प्रसिध्दी देत असतात. आज पत्रकार दिनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सर्व पत्रकार एकत्र येवून पत्रकार दिन साजरा होत असल्याचा आनंद होत आहे. 
यावेळी समितीकडून पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी व दीपक महाडिक यांना जीवन गौरव पुरस्कार तर निर्भय युवा पत्रकार म्हणून मयूर तांबडे, अनिल भोळे, सागर राजे यांना सन्मानित करण्यात आले. तर पत्रकार भूषण म्हणून संजय कदम यांना सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. अमित दवे यांनी धन्वंतरी, विधी विभागात कार्यरत असलेले अ‍ॅड. देवेंद्र पाटेकर, सामाजिक क्षेत्रात कार्यरत संतोष ठाकूर आणि प्रकाश गायकवाड यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कोरोना काळात आणि पूर दुर्घटनेत ज्यांनी सढळ हस्ते तन मन धनाने मदत केली अशा जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांना देखील समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने प्रितम म्हात्रे यांनी हा पुरस्कार स्विकारला. तर पनवेलमधील पत्रकारांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन पुढे असेच कार्य सुरु राहणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे निवेदन डॉ. धनश्री सरदेशपांडे व प्रवीण मोहोकर यांनी सुरेख पध्दतीने 
यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सरचिटणीस विशाल सावंत, कार्याध्यक्ष केवल महाडिक, सहचिटणीस रवींद्र गायकवाड, प्रसिध्दी प्रमुख संतोष सुतार, संतोष भगत, प्रवीण मोहोकर, सुनिल कटेकर, सनिप कलोते, राजेंद्र कांबळे,  दिपाली पारसकर, गौरव जहागीरदार, लक्ष्मीकांत ठाकूर, गणपत वारगडा, भरतकुमार कांबळे, अ‍ॅड. मनोहर सचदेव, आनंद पवार, कैलास खोंडे, तसेच किरण बाथम, असीम शेख, अनिल कुरघोडे, लक्ष्मण ठाकूर, अनिल राय, भानूदास बोरीले, शंकर वायदंडे आदी उपस्थित होते.
Comments