रिक्षाला वाहनाची धडक दोघेजण जागीच ठार...
रिक्षाला वाहनाची धडक दोघेजण जागीच ठार..

पनवेल, / दि.14 (संजय कदम)   ः एका अज्ञात वाहनाची धडक रिक्षाला बसल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालक व त्याच्या पाठीमागे बसलेला प्रवाशी या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर पनवेलजवळ घडली आहे.
रिक्षा चालक अप्पू शेेखप्पा अलूर (53) हे एका प्रवाशाला घेवून एक्सप्रेस मार्गावरुन बंदी असतानाही रिक्षा घेवून जात असताना कळंबोली सर्कलपासून अंदाजे दिड कि.मी. अंतरावर त्या रिक्षाला अज्ञात वाहनाची समोरुन धडक बसल्याने झालेल्या अपघातात यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments