खारघर येथील कु.उन्नती साळवीने जिंकले मिस स्टायलिन स्टार इंडिया चे विजेतेपद..
खारघर येथील कु.उन्नती साळवीने जिंकले मिस स्टायलिन स्टार इंडिया चे विजेतेपद..
पनवेल दि.11 (वार्ताहर)- खारघर येथे राहणाऱ्या उन्नती विकास साळवी हिने नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या रॉयल कॅनॉट बोट क्लब येथील शोमध्ये  मिस स्टायलिन स्टार इंडिया 2022 चे विजेतेपद पटकावल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
            खारघर,  येथे राहणारी 19 वर्षांची कु. उन्नती विकास साळवी ही येरळा मेडिकल कॉलेज, खारघर येथे आयुर्वेदाची विद्यार्थीनी आहे. तिचे वडील पोलिस खात्यात अधिकारी आहेत. भावी काळात तिला सर्जन होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. आयएनआयएफडी पनवेल येथे सोल सेन्सेशन 3.o साठी शोस्टॉपर आहे. मिस मेस्मेरिक क्वीन इंडिया 2021 मध्ये 'प्रेक्षणीय डोळे' चे उपशीर्षक आणि मिस स्टायलिन स्टार इंडिया 2022 चे विजेतेपद जिंकले. हा शो नुकताच रॉयल कॅनॉट बोट क्लब, पुणे येथे झाला. त्याचबरोबर तिने इतर अनेक फॅशन शोमध्ये सहभाग घेतला असून त्यातसुद्धा प्राविण्य मिळविले आहे. या तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
           

फोटोः कु. उन्नती विकास साळवी
Comments