ट्रकची चोरी..
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः तळोजा औद्योगिक वसाहत परिसरात उभ्या करून ठेवलेल्या लाखो रुपये किंमतीच्या ट्रकची चोरी केल्याची घटना घडली आहे.
नागझरी गावात राहणारे ज्ञानेश्वर चव्हाण यांनी त्यांचा ट्रक क्र.एमएच-04-डीके-7484 हा तळोजा औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर उभा करून ठेवला असता अज्ञात चोरट्याने सदर ट्रक चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.