नवीन पनवेल येथील आगीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत – नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांची पाहणी...
नवीन पनवेल येथील आगीतील दुर्घटनाग्रस्त  कुटुंबांना तातडीची मदत – नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांची पाहणी...

पनवेल / प्रतिनिधी : -
नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक १८, सेक्टर 1/S मधील इंडस्ट्रियल एरिया परिसरात असलेल्या वसाहतीत अचानक लागलेल्या आगीत सात घरांचे संपूर्ण नुकसान झाले. सुदैवाने ही घटना दिवसा घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत सात कुटुंबांचे घरगुती साहित्य, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू तसेच शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे व ज्येष्ठ नेते प्रभाकर कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी आगीग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांचा आढावा घेतला. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाशी त्वरित संपर्क साधून बाधित कुटुंबांसाठी राहण्याची व खाण्यापिण्याची तातडीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
याचबरोबर, ज्या कुटुंबांची घरे पूर्णतः उध्वस्त झाली आहेत, त्यांना प्राथमिक स्वरूपात जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत, कपडे तसेच लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात येईल, असे आश्वासन नगरसेविका सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी दिले.

कोट :
“आज ही दुर्घटना दिवसा घडल्याने सर्वजण कामावर असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे समाधानकारक आहे. मात्र कुटुंबांचे संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू आगीत जळून राख झाल्या आहेत. अशा कठीण प्रसंगी माझी जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था तसेच संपूर्ण भारतीय जनता पक्ष परिवार या  कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शासनाच्या सहकार्याने तसेच आमच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाला पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.”
— प्रितम जनार्दन म्हात्रे
भाजपा नेते
मा. विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image