पत्रकार रत्नाकर पाटील यांना पितृशोक...
पत्रकार रत्नाकर पाटील यांना पितृशोक...
नवीन पनवेल / (प्रतिनिधी): पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांचे पिताश्री बाळाराम अंबू पाटील(आप्पा) यांचे नुकतेच (दि.28 जानेवारी) रोजी सकाळी दुःखद निधन झाले. ते निवृत्त प्राथमिक शिक्षक होते. मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्ष होते. त्यांच्या पश्चात 4 विवाहित मुले, 2 विवाहित मुली, जावई, सूना, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे.
         बाळाराम पाटील हे मनमिळाऊ स्वभावाचे होते, त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांचा दशक्रिया विधी रविवार दि.6 फेब्रुवारी रोजी पेण तालुक्यातील रावे गावात पातळगंगेच्या तीरी होणार आहे, तसेच तेरावा विधी कार्य बुधवार दि. 9 फेब्रूवारी रोजी राहत्या घरी (मु.पो.रावे, तालुका-पेण) येथे होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
Comments