अपक्ष उमेदवार संजय घोसाळकर यांचा अर्ज दाखल, २४ तास सामाजिक ध्यास चा नारा
कळंबोली (दीपक घोसाळकर) : पाली नगर पंचायतीच्या उर्वरित चार जागांची निवडणूक आता चुरशीची होऊ लागली आहे. प्रभाग नंबर ८ मधून पाली मधील सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेले समाजसेवक संजय दत्तात्रय घोसाळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदारांनी व नागरिकांनी केलेल्या लोक आग्रहास्त्व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे .त्यांना समाजातील नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे.
पाली नगरपंचायतीचे उर्वरित चार जागांची निवडणूक १८ जानेवारीला होत आहे . प्रभाग क्रमांक ८ मधून पालीतील समाजसेवें मध्ये नेहमी अग्रेसर असलेले संजय उर्फ आप्पा घोसाळकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल केला आहे. त्यावेळी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांचे कुटुंबीय व पालीतील नागरिक उपस्थित होते. संजय घोसाळकर हे पाली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणूनही त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. पालीतील विविध नागरी समस्यांना शासन स्तरावर वाचा फोडून त्या शासकिय अधिकारी यांचेशी समन्वय साधून सोडवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो .पालीतील नागरिकांनी आग्रह केल्यानुसार त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पाली नगरपंचायतीच्या निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.२४ तास सामाजिक ध्यास चा नारा घेऊन ते गेल्या अनेक वर्षापासून पालीतील समाज जीवनात काम करीत आहेत. नागरिकांच्या अडीअडचणीला तत्परतेने रात्री बेरात्री केव्हाही हाकेला साद देऊन त्यांना मदत करण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे त्यांनी पालीतील समाज जीवनावर वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जा मुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.