गंठण चोरांशी दोन हात करणाऱ्या महिलेची कामगिरी कौतुकास्पद...
गंठण चोरांशी दोन हात करणाऱ्या महिलेचे होत आहे कौतुक
पनवेल, दि.9 (वार्ताहर)- गळ्यातील दागिने खेचून पळण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरांविरूद्ध एका महिलेने केलेल्या दोन हाताबद्दल सदर महिलेचे पनवेल परिसरात कौतुक होत आहे.
           शहरातील दांडेकर हॉस्पिटल परिसरातून सौ. सुरेखा चाळके या फोनवर बोलत चालले असताना अचानक पणे दुचाकीवरील दोन चोरांनी त्यांच्या गळ्यातील दागिने खेचण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याला चांगलाच विरोध करीत त्याच्याबरोबर दोन हात करीत त्या दोघांना पळवून लावले. यावेळी परिसरातील पादचारीसुद्धा त्यांच्या मदतीस धावल्याने आता आपली खैर नाही याची जाणीव चोरांना झाल्याने ते आपल्या दुचाकीवरून पसार झाले. याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली असून त्या दृष्टीने पनवेल शहर पोलिस त्या दोघांचा शोध घेत आहेत. या त्यांच्या धाडसाबद्दल नगरसेविका प्रिती जॉर्ज म्हात्रे, कल्पना ठाकूर व इतर महिला वर्गाने कौतुक केले आहे.
          

फोटोः सौ. सुरेखा चाळके यांचे कौतुक करताना नगरसेविका प्रिती जॉर्ज म्हात्रे व इतर महिला वर्ग
Comments