मोबाईलची चोरी..
मोबाईलची चोरी

पनवेल, दि.8 (संजय कदम) ः राहत्या घरातील हॉलमध्ये ठेवलेला मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना पळस्पे फाटा येथील एका सोसायटीमध्ये घडली आहे.
सानिया फिरोज पठाण, रा.समरपार्क, शिफा हॉस्पिटलच्या पाठीमागे त्यांनी 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन राहत्या घरातील हॉलमध्ये ठेवला असता कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी सदर मोबाईल फोन चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments