पनवेल परिसरात कोल्ह्याचा मुक्त वावर, ८ ते १० जण जखमी..
पनवेल दि.11 (वार्ताहार)- पनवेल तालुक्यातील ग्रामिण भागात कोल्ह्याचा मुक्त संचार होत असून, त्याने आत्तापर्यत्त 8 ते 10 जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातारण पसरले आहे.
मोसारा, मानघर, कुंडेवहाळ व पनवेल परिसरातील ग्रामिण भागातील गावांमध्ये कोल्ह्याचा मुक्त वावर होत आहे. या कोल्ह्याने आत्ता पर्यत्त जवळपास 8 ते 10 जणांना चावा घेऊन जखमी केले असून, यामध्ये लहान मुलीचाही समावेश आहे. जखमींनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली आहे. दरम्यान काही जागरुक ग्रामस्थांनी या बाबतची माहिती वन विभाग व संबधीत पोलिस ठाण्याला दिली आहे. हा एकच कोल्हा सर्वत्र फिरत आहे का कोल्ह्यांची टोळी फिरतेय, वन खात्यासमोर आवाहन आहे. तरी नागरीकांनी बाहेर फिरताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.