राज्यस्तरीय सबज्युनिअर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांची ऐतिहासिक कामगिरी..
राज्यस्तरीय सबज्युनिअर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांची ऐतिहासिक कामगिरी..
पुणे / प्रतिनिधी : -   निगडी-पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या 55 व्या सबज्युनिअर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथील 19 खेळाडूंनी मुंबई उपनगर संघाचे प्रतिनिधित्व करत 37 पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत मुलींच्या वयोगटात नीती दोशी, नेहा पास्ते, उर्वी परब, अनन्या तिर्लोटकर व अलिशा टाककर यांनी 12 वर्षा खालील सांघिक रौप्य पदक तसेच स्वाती मोहिते, मुद्रा झगडे, टियाना क्रास्टो व हर्षल घोलम यांनी 10 वर्षा खालील सांघिक कांस्य पदक प्रशिक्षक अचल रेवाळे व  विशाल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पटकावले. 
मुलांच्या 14 वर्षाखालील वयोगटात अध्यान देसाई याने वैयक्तिक 7 पदके जिंकत प्रथम, जश पारीख याने 5 पदके जिंकत द्वितीय क्रमांक शुभम गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केला. याच वयोगटात अमन देवाडिगा याने 2 व मन कोठारी याने सुद्धा 3 पदक कमावले. 12 वर्षाखालील वयोगटात वीर गाला, आश्रव वर्तक यांनी प्रत्येकी 2 पदके पटकावत तनिष पुरी याच्यासोबत सांघिक विजेतेपद जिंकले. 10 वर्षाखालील वयोगटात जीत चव्हाण 4 पदके जिंकत वैयक्तिक द्वितीय क्रमांक मिळविला, त्याच्याच जोडीला जय तहसीलदार आणि चिन्मय दुखांडे यांनी सांघिक विजेतेपद मिळविण्यासाठी मदत केली.
प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे व मुंबई उपनगर मुलांच्या संघाचे प्रमुख प्रशिक्षक शैलेंद्र लाड यांनी मुलांच्या 10 , 12 व 14 या तिन्ही वयोगटात राज्यस्तरीय सांघिक अजिंक्यपद जिंकून देऊन इतिहास घडविला.
या ऐतिहासिक कामगिरी बद्दल प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे श्री. अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभागाच्या प्रमुख) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांसह संपूर्ण प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या संघ परिवारावर सर्वत्र कौतुकाचा वर्षांव होत आहे.
Comments