शिवसेना आयोजित व्हॉईस ऑफ पनवेल सुगम संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्साहात संपन्न..
शिवसेना आयोजित व्हॉईस ऑफ पनवेल सुगम संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्साहात संपन्न
पनवेल दि.१६ (वार्ताहर)- हिंदुहृयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या येऊ घातलेल्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यानुसारच पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पनवेल महानगर क्षेत्राचे संघटक व मा. नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल तालुक्यातील नवोदित कलाकारांसाठी प्रतिष्ठित अशी "व्हॉइस ऑफ पनवेल" या नावाने एक भव्य सुगम संगीत स्पर्धा आयोजित केली आहे. 

        शिवसेना पनवेल तर्फे आयोजित या स्पर्धेचा एलिमिनेशन राऊंड नुकताच पार पडला असून या स्पर्धेसाठी तब्बल ११५ गायक कलाकारांनी सहभाग घेतला होता. हिंदी व मराठी अशा भाषांमध्ये नवीन जुनी वैविध्यपूर्ण गाण्यांचे सादरीकरण स्पर्धकांनी केले. एखाद्या व्यावसायिक रियालिटी शो प्रमाणे अत्यंत शिस्तीत व नियोजनबद्ध असे आयोजन करण्यात आले होते. अल्पावधीतच या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळून त्यापैकी तीस जणांची पुढील फेरी करता निवड करण्यात आली आहे. व आता त्यातून फक्त सहा जणांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे. सौ कविता वेलणकर, सौ माधुरी वैद्य, व कोल्हापुरे सर यांनी प्राथमिक फेरीसाठी परीक्षणाचे काम केले. स्पर्धेच्या आयोजनात राज्य सरकारने घालून दिलेल्या को कोविड प्रोटोकॉल तंतोतंत पाळला गेला. साहेबांच्या जयंती निमित्त प्रतिवर्षी अशाप्रकारे व्हॉइस ऑफ पनवेल या नावाने ही सुगम संगीत स्पर्धा भव्य प्रमाणात घेणार असल्याचे महानगर संघटक प्रथमेश सोमण यांनी सांगितले. स्पर्धेचे आयोजन व प्राथमिक फेरी यशस्वी करण्यासाठी प्रथमेश सोमण यांचे सोबत शहर प्रमुख अच्युत मनोरे , शहर संघटक प्रवीण जाधव, महिला आघाडीच्या अर्चना कुलकर्णी, उपशहर प्रमुख राहुल गोगटे, अनिल कुरघोडे, माजी नगरसेवक विश्वास म्हात्रे, विभाग प्रमुख सुजल मुसलोंडकर, शाखाप्रमुख अभिजीत साखरे, प्रसाद सोनवणे, युवासेनेचे पराग मोहिते, निखिल भगत, अभिनय सोमण व 'आमचे आम्हीच' नाट्यसंस्थेचे कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.

       
फोटो- शिवसेना आयोजित व्हॉईस ऑफ पनवेल सुगम संगीत स्पर्धा
Comments