कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अडीच लाखांचा दंड वसूल...
कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अडीच लाखांचा दंड वसूल 
पनवेल / वार्ताहर  : शासनाने आखून दिलेल्या कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यात अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क न लावणारे नागरिक तसेच गर्दी करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे.
           कोविड आणि ओमायक्रोनचा वाढता धोका लक्षात घेता शासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र काही नागरिक मास्क परिधान करत नाहीत तसेच गरज नसताना अनेक ठिकाणी गर्दी केली जात आहे. पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने पनवेल तालुक्यातील दुकाने, गर्दीची ठिकाणे, होलसेल दुकाने, मेडिकल, डेअरी, इतर शॉप या ठिकाणी मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मंडळ अधिकारी पळस्पे पथक यांनी कोन येथील पाच आर्केस्ट्रा बार वर कारवाई करून 44 हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे नागरिकांनी मास्क परिधान करावा आणि गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Comments