नगरसेवक रवींद्र भगत यांच्या हस्ते प्रॉस्पेरीटी लॉजेस्टिक सोल्यूशनच्या गोदामाचे उदघाटन ...
नगरसेवक रवींद्र भगत यांच्या हस्ते प्रॉस्पेरीटी लॉजेस्टिक सोल्यूशनच्या गोदामाचे उदघाटन
पनवेल / वार्ताहर  : - शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक रवींद्र भगत यांच्या हस्ते उद्योजक संजय थोरबोले यांच्या प्रॉस्पेरीटी लॉजेस्टिक सोल्यूशनच्या दहिसर ( पिंपरी ) येथील नव्या गोदामाचे उदघाटन मकर संक्रातीच्या ( शुक्रवार ता.14) दिवशी पार पडले.
यावेळी नगरसेवक भगत यांनी कुरियर बॉय ते उद्योजक बनण्याच्या थोरबोले यांच्या यशस्वी प्रयत्नांचे कौतुक केले.शुक्रवारी पार पडलेल्या या छोटेखांनी कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक भगत यांच्या सोबत प्रल्हाद चौधरी, सुनील भगत, वीरेंद्र लोखंडे, रमेश शिंत्रे, पंकज पाटील आदी उपस्थित होते.
Comments