शिवसेना पनवेल शहरप्रमुखपदी प्रविण जाधव यांची नियुक्ती
शिवसेना पनवेल शहरप्रमुख पदी प्रविण जाधव यांची नियुक्ती

पनवेल / अनिल कुरघोडे : - शिवसेना पनवेल शहर शाखेच्या नूतनीकरणाचे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दि.२२ जाने. रोजी धडाडीचे, आक्रमक , कार्यतत्पर प्रविण जाधव यांना खासदार श्रीरंग अप्पा बारणे व जिल्हाप्रमुख शिरिष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रमेश गुडेकर, शिरीष बुटाला, यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन पनवेल शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.

प्रवीण जाधव यापूर्वी ग्राहक कक्ष पनवेल प्रमुख, तसेच उपशहरप्रमुख, शहर संघटक अश्या पदांना न्याय देत त्याची वरिष्ठांकडून दखल घेत त्यांची शिवसेना पनवेल शहरप्रमुख पदी नेमणूक करण्यात आली. यावेळी बोलताना प्रवीण जाधव यांनी सांगितले की वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याला मी योग्य तो न्याय नक्कीच देण्याचा प्रयत्न करीन , तसेच येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणूकीत शिवसेनेचा भगवा पनवेल शहरात फडकवणारच असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी प्रवीण जाधव यांना वरिष्ठांकडून पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील,विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर,तालुका संघटक भरत पाटील, दीपक निकम, गुरुनाथ पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, महानगर संघटक प्रथमेश सोमण, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, डी. एन.मिश्रा, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, लीलाधर भोईर, शंकर ठाकूर, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी,राहुल गोगटे, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, मा.नगरसेवक अच्युत मनोरे, अनिल टेमघरे, अतुल पलण, शाखाप्रमुख अभिजित साखरे, उपविभाग प्रमुख रवींद्र शेट्ये,चंद्रकांत शिर्के, प्रसाद सोनवणे, केवल माळी, राकेश गोवारी,करण सोनवणे, किरण तावदरे, संकेत बुटाला, रवींद्र पडवळ, सतीश कळमकर, अमर पटवर्धन, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, प्रमिला कुरघोडे, सुनंदा पाटील ,अर्चना कुळकर्णी, उज्वला गावडे, रुही सुर्वे, अपूर्वा प्रभू, कोमल कुरघोडे, सुचिता शिर्के, आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Comments