गुन्हे शाखा कक्ष 3 ची धडक कारवाई ; 60 लाख 72 हजार रुपयाची प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व पानमसाल्याच्या साठ्यासह चार टेम्पो जप्त ; 7 आरोपी गजाआड..
गुन्हे शाखा कक्ष 3 ची धडक कारवाई ; 60 लाख 72 हजार रुपयाची प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व पानमसाल्याच्या साठ्यासह चार टेम्पो जप्त ; 7 आरोपी गजाआड
पनवेल, दि.18 (संजय कदम) ः कक्ष 3 गुन्हे शाखेकडुन 60,72,000 / - रुपये किंमतीचा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व पानमसाला ( गुटखा ) साठयासह चार टेम्पो जप्त करून 07 आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. या त्यांच्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीररित्या असा व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. 
नशा मुक्त नवी मुंबई  या अभियानाचे अनुशंगाने अंमली पदार्थ साठा, खरेदी विक्री व व्यसन करणार्‍या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबच्या आदेशा प्रमाणे कक्ष 3 गुन्हे शाखेकडुन काम सुरू असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना गोपनिय बातमीदारामार्फत महापे एमआयडीसी परिसरात मोठया प्रमाणात गुटख्याचा साठा करण्यात आला असून त्याची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस उप आयुक्त, सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर भागामध्ये कक्ष 3 गुन्हे शाखेकडुन गस्त व सापळा रचण्यात आला होता. दरम्यान महापे एम.आय.डी.सी मधील टाटा मोटर्स परिसरातील पी.ए. पीए 202 या गोडावुन जवळ चार संशयीत टेम्पो दिसुन आल्याने त्यापैकी एका टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये विमल गुटखा मिळून आला. त्यानंतर चारही टेम्पोची तपासणी करता सदर ठिकाणी मिळून आलेल्या चारही टेम्पो मध्ये विमल गुटखा भरलेला आढळुन आला त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी सदरचा विमल गुटखा त्या ठिकाणचे गोडावुन मधुन टेम्पोमध्ये भरल्याचे टेम्पो चालकांनी सांगितले. नमुद गोडावूनमध्ये जावुन पाहणी केली असता तेथेही गुटखा मिळुन आल्याने सदर ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी राहूल संपतराव ताकाटे यांना तात्काळ बोलावुन पंचासमक्ष एकुण 42,72,000/ - रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू व पानमसाला (विमल गुटखा) व गुन्हा करण्याकरिता वापरलेली 18,00,000/ - रुपये किंमतीची एकुण 04 टेम्पो जप्त करण्यात आले आहेत . सदर गुन्हयात एकुण 60,72,000 / - किमंतीचा मुद्देमाल जप्त 07 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आरोपी इसरार अहमद नियाज अहमद शेख वय 45 वर्षे, रा . ठाणे रोड, भिवंडी, जि . ठाणे सुरज हरिश ठक्कर वय 41 वर्षे, रा . डोंबिवली ( पूर्व ) जि . ठाणे 3 सस्तु रामेत यादव वय 34 वर्षे , रा . शितलगंज , जि . गौंडा , राज्य उत्तर प्रदेश । नितीन बाबूराव कसबे वय 4 9 वर्षे , रा . मुलुंड पश्‍चिम मुंबई 5 नौरुद्दीन अलिशौकत सय्यद वय 26 वर्षे , रा . मानखुर्द मुंबई मोहम्मद नफिस रफिक शेख वय 34 वर्षे , रा . दहिसर मोरी , ता . जि . ठाणे 2 4 7 पवनकुमार पन्नालाल श्रीवास्तव वय 27 वर्षे , रा . नवी मुंबई हे आहेत. सदर आरोपी हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू व एमआयडीसी पानसाला (विमल गुटखा) परराज्यातुन छुप्या मार्गाने कमी दराने खरेदी करून, परिसरातील गोडावुन भाडयाने घेवुन त्याठिकाणी साठा करून छोटया छोटया टेम्पोमधुन नवी मुंबई, मुंबई , ठाणे परिसरातील व्यावसायीकांना जादा दराने विक्री करण्याकरीता घेवुन जात असत. सदरची कारवाई बिपीन कुमार सिंह पोलीस आयुक्त, डॉ.जय जाधव, सह पोलीस आयुक्त महेश घुर्ये अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), यांच्या सुचनांप्रमाणे सुरेश मेंगडे,  पोलीस उप आयुक्त, गुन्हे व विनायक वस्त, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष 3, गुन्हे शाखेचे वपोनिरी शत्रुघ्न माळी, सपोनि ईशान खरोटे, पोहवा मोरे , पोहवा कोळी, पोहवा वाघमोडे, पोना पाटील, पोना जेजूरकर, पोना पाटील, पोना फुलकर, पोना जोशी, पोना मोरे, पोना सोनवलकर , यांनी सहभाग घेवुन महत्वपुर्ण कामगीरी बजावलेली आहे.


फोटो ः पोलीस आयुक्त नवी मुंबई शाखेने हस्तगत केलेला गुटखा व ट्रक
Comments