लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ७५ अभंगांचे भव्य व्हिडिओ चित्रिकरण ....
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ७५ अभंगांचे भव्य व्हिडिओ चित्रिकरण ....
                           
नादब्रह्म साधना मंडळाचा उपक्रम ...

पनवेल (प्रतिनिधी) थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त नादब्रह्म साधना मंडळाच्यावतीने ७५ अभंगांच्या भव्य व्हिडिओ चित्रिकरण उपक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते, सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर, योगीनगर (धोंडळी) येथील दत्त मंदिरात करण्यात आला.
        यावेळी भजनसम्राट हरिभक्त परायण निवृत्तीबुवा चौधरी, नादब्रह्म साधना मंडळाचे अध्यक्ष वसंतबुवा पाटील, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी, नगरसेवक नितेश पाटील, माजी सरपंच संतोष पाटील, विनोद पाटील, अशोक पाटील, राम पाटील, विलास खानावकर, कैवारी पाटील यांच्यासह नादब्रह्मा साधना मंडळाचा शिष्य परिवार उपस्थित होता.

या विशेष उपक्रमांतर्गत एकूण पंच्याहत्तर अभंगांचे ध्वनीमुद्रण व व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येत आहे. रेकॉर्डिंग प्रसंगी भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेवा समाजाला अर्पण केला जात आहे. हे अभंग केवळ एका वर्षापुरते मर्यादित नसून, पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या अभंगांची रचना व सादरीकरण विविध अनवट आणि पारंपरिक रागांवर आधारित चालींमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे नवोदित विद्यार्थी, शिष्यवर्ग आणि संगीत अभ्यासकांना रागांची शास्त्रशुद्ध व सुसूत्र ओळख होण्यास मोठी मदत होणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेतील रागसंवर्धन आणि सातत्यपूर्ण जतन हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.सदर उपक्रमामुळे भक्ती, संगीत आणि संस्कार यांचा सुंदर संगम समाजास अनुभवता येणार आहे. अभंगांच्या माध्यमातून आध्यात्मिक मूल्यांची जपणूक होऊन नव्या पिढीसमोर एक आदर्श उभा राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. लवकरच हे सर्व अभंग सर्व रसिक श्रोत्यांसाठी खुले करण्यात येणार असून, त्यांचे अधिकृत प्रकाशनही लवकरच करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अमृत महोत्सव वर्षाला आणखी एक सांस्कृतिक व आध्यात्मिक अधोरेखा लाभली आहे.

Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image