हेमलता पाटील राष्ट्रीय लोकगौरव एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित...
हेमलता पाटील राष्ट्रीय लोकगौरव एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित...
   
कळंबोली :   सु.ए.सो.मराठी प्राथमिक विद्यालय कळंबोली शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ.हेमलता रविंद्र पाटील  यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेमार्फत दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय लोकगौरव एक्सलन्स पुरस्कार  वाशी येथे झालेल्या मोठ्या दिमाखदार कार्यक्रमात त्यांना हा राष्ट्रीय लोकगौरव एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.
       सहाय्यक शिक्षिका ते मुख्याध्यापिका म्हणून शैक्षणिक क्षेत्रात केलेली अतुलनीय कामगीरी व सामाजिक क्षेत्रात विविध महिला मंडळ व विविध  संघटनांची पदे भूषवत असताना त्या पदांना दिलेला उचित न्याय या सर्वांचा परिपाक म्हणजे सदरचा पुरस्कार आहे.  सदर प्रसंगी सुप्रसिद्ध उद्योजक तथा ज्येष्ठ समाजसेवक मा.डाॅ. नानजीभाई ठक्कर ठाणावाला, एकनाथ खोल्लम सहाय्यक पोलिस आयुक्त मा. रविंद्र पवार साहेब,  सहा.पोलिस आयुक्त, .साक्षी परांजपे सिने अभिनेत्री,  अरूण कुमार सिरियल अभिनेते, जया अमिलचंदानी, आदी मान्यवरांसह लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
   सौ. हेमलता पाटील या रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा शिक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संघटनेचे अध्यक्ष संदिप कदम, उपाध्यक्ष सुधाकर जैवल, मिनाक्षी कर्वे, कार्याध्यक्ष साईनाथ गावंड, सेक्रेटरी यशवंत मोकल, दिपक घोसाळकर, खजिनदार संतोष बारी, प्रसिद्धी प्रमुख धनाजी घरत, जिल्हा संघटक संतोष जाधव, मेघा मोरे, सचिन सावंत, ज्ञानेश्वर ठाकूर, विनायक धाटावकर, सुगिंद्र म्हात्रे, देवेंद्र केळूसकर, दिपक सुर्यवंशी यांच्या सह सर्व तालुका अध्यक्ष व कार्यकारिणीच्या पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष व मोबाईल द्वारे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
Comments