जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था कळंबोलीच्या अध्यक्षपदी प्रकाश चांदिवडे तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत साबळे ..
पनवेल, दि.23 (संजय कदम) ः जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कळंबोली या संस्थेची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पनवेल बालाजी वाघमारे यांच्या उपस्थितीत व सौ. निता पुगावकर अध्यासी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 11 नवनिर्वाचित समिती सदस्यांची विशेष सभा आयोजित करुन उपविधीतील तरतुदीप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाली.
यात नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश रामचंद्र चांदिवडे, उपाध्यक्ष चंद्रकांत कृष्णांत साबळे, सदस्य सिताराम गणपत आंबे, शरद सोपान भोसले, शहाजी शिवाजी नलावडे, निलेश कुंडलिक काळभोर, अनिल श्रीरंग मेटकरी, कल्पेश प्रकाश चांदिवडे, कु. ओमकार दिपक चव्हाण, सौ. पूनम प्रकाश चांदिवडे, सौ. उत्कर्षां उद्देश पवार यांची निवड करण्यात आली. सन 2021 ते 2026 या पंचवार्षिक कालावधीसाठी नवनिर्वाचित संचालक समितीची निवड झाली आहे सर्व संचालकांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.