खारघर मध्ये लाईफ लाईन हॉस्पिटलची शाखा सुरू...
खारघर मध्ये लाईफ लाईन हॉस्पिटलची शाखा सुरू...

पनवेल/प्ररीनिधी
      पनवेल मधील नामांकित अश्या लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ प्रकाश पाटील यांनी गेली १५ ते २० वर्षे पनवेल परिसरातील नागरिकांची सेवा केल्यानंतर आता खारघर व मधील नागरिकांसाठी त्यांच्या माध्यमातून नवीन शाखा खारघर मध्ये  उघडली याचा आनंद होत आहे असे आम. बाळाराम पाटील यांनी सांगितले .ते काल १६डिसेंबर२०२१रोजी खारघर मध्ये लाईफ लाईन हॉस्पिटलच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
        या उदघाटन सोहळ्यासाठी पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,नगरसेविका लीना गरड, नगरसेविका नेत्रा किरण पाटील ,खारघर भाजप मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
           या प्रसंगी लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ प्रकाश पाटील यांनी सांगितले मी या भागात आयव्हीएफ थेरेपी सुरू केल्यानंतर ज्या जोडप्यांना मूल होत नव्हते  त्यांच्या डोळ्यात आनंद निर्माण केला, आता माझा मुलगा अजिंक्य पाटील यांनी युरोलॉजी मध्ये प्राविण्य मिळवले आहे, तसेच माझी मुलगी केतकी पाटील म्हस्के ही महिलांचे आजार आणि जावई अभिजित म्हस्के हे हाडांचे विकार या मध्ये निष्णात आहेत, तेव्हा पनवेल सह खारघर मधील नागरिकांसाठी सेवा देताना आनंद होणार आहे.
Comments