मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रभागातील गोविंद गार्डन सोसायटीची सोडवली समस्या..
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रभागातील गोविंद गार्डन सोसायटीची सोडवली समस्या..
पनवेल / वार्ताहर : - प्रभाग १८ मधील स्वामी नित्यानंद मार्गाचे काँक्रीटीकरण होऊन बरीच वर्षे लोटली आहेत.पण आद्यप ही महानगरपालिकेने या मार्गावरील दुतर्फा स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे काम केले नाही.त्यामुळे स्वामी नित्यानंद मार्ग लगतच्या सोसायट्यांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्याची उंची वाढल्यामुळे सोसायट्यांना जाणाऱ्या रस्त्याला उतार जास्त प्रमाणात होता.त्यामूळे दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांना रहदारीस त्रास होत आहे.या विषयाला अनुसरून गोविंद गार्डन सोसायटीच्या वतीने नगरसेवक विक्रांत पाटील यांना रॅम्प बनवून द्याची विनंती करण्यात आली.सोसायटीच्या नागरिकांना होणार त्रास लक्षात घेत त्यांच्या विनंतीला मान देऊन विक्रांत पाटील यांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगून मटेरियल मागवून काँक्रीट रॅम्प बनवून दिला.रॅम्प बनवून दिल्याबद्दल गोविंद गार्डन सोसायटीच्या लोकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले.
Comments