आरपीआय डेमोक्रेटीकचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कनिष्क कांबळे यांची पनवेलला सदिच्छा भेट...
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीकचे) राष्ट्रीय कार्याध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या महाराष्ट्रातील आगामी निवडणुकी संदर्भातील नियोजित पुणे दौर्यानिमित्त त्यांनी पनवेल येथे थांबून कार्यकर्ते व पदाधिकार्यांशी चर्चा केली.
यावेळी त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर व आ.प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली व आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा केली. यावेळी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्याशी कनिष्क कांबळे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आाहेत. त्यामुळे त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे त्यांची भेट घेवून आगामी निवडणुक रणनिती संदर्भात चर्चा केली व पुढील महाराष्ट्र दौर्यासाठी शुभेच्छा दिल्या.