फुस लावून गेलेल्या अल्पवयीन मुलीला पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात...
फुस लावून गेलेल्या अल्पवयीन मुलीला पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात...
पनवेल, दि.3 (संजय कदम) ः एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून अपहरण केल्याप्रकरणी तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार विशेष पथकाने सदर मुलीचा तांत्रिक तपासाच्या आधारे तपास काढून प्रयागराज उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे या संदर्भात सदर मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करताच वपोनि रवींद्र दौंडकर व गुन्हे शाखेचे पो.नि.खेडकर आदींच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत शिर्के व पोलीस नाईक हिंदूराव कदम व महिला पोलीस शिपाई समिक्षा घरत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास करून यातील अपहरीत अल्पवयीन मुलगी हि ग्राम-बडहा तालुका-कौन्धीयार जिल्हा-प्रयागराज, उत्तरप्रदेश राज्य येथे असल्याचे तपासात निष्पन्न केले व वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने व मार्गदर्शनाने पोलीस पथक हे सदर ठिकाणी रवाना झाले असता त्यांना सदर अल्पवयीन मुलगी ही मिळून आली. 
सदर मुलीस ताब्यात घेवून पनवेल येथे परत आणण्यात आणून तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.


फोटो ः फुस लावून पळविलेल्या अल्पवयीन मुलीस पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात
Comments