अल्पवयीन मुलाला दगड वेचण्याच्या कामाला लावण्याप्रकरणी तक्रार दाखल...
पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः स्वतःच्या फायद्याकरिता दोन अल्पवयीन मुलांना दगड वेचण्याच्या कामाला लावल्याप्रकरणी तळोजा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
येथील हॅप्पी होम साईट घोटगाव या ठिकाणी दोन मुले दगड वेचण्याचे काम करीत होते. यावेळी सबाउद्दीन मंडल यांनी ते पाहिले व त्याबाबतची तक्रार तळोजा पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी अत्तरभाई विरोधात गुन्हा दाखल केला आहे.