महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या उपाध्यक्षपदी अरुणभाई स्वरुप, राजेंद्र यादव तर जिल्हाध्यक्षपदी सचिन मोरे यांची नियुक्ती..
महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या उपाध्यक्षपदी अरुणभाई स्वरुप, राजेंद्र यादव तर जिल्हाध्यक्षपदी सचिन मोरे यांची नियुक्ती
पनवेल, दि.31 (संजय कदम) ः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्ष प्रमुख  उध्दव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशा नुसार, पर्यावरण  मंत्री  आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कामगार सेना (महासंघ) संलग्न  महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष  निलेश भोसले यांच्या सूचनेनुसार संघटनेच्या विविध पदाधिकार्‍यांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये अरुणभाई स्वरूप, राजेंद्र यादव. उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, प्रमोद सुर्वे समन्वयक महाराष्ट्र राज्य, सचिन मोरे रायगड जिल्हा अध्यक्ष यांची वरील पदी नियुक्ती करण्यात आली. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments