कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन .....
कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६५ व्या  महापरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन .....

पनवेल : - कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 65 व्या  महापरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन सभा कामोठे येथील पोलीस स्टेशन समोरील सत्यकेतू चौकात आयोजित केली होती. 
यावेळी प्रमूख पाहुण्या सौ. लीनाताई गरड नगरसेविका पनवेल महानगरपालिका ह्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच मेणबत्ती प्रज्वलीत करुन पुष्प अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी नगरसेविका लीनाताई गरड, कामोठे कॉलोनी फोरमचे अध्यक्ष  मंगेश अढाव, प्रा. मिलींद ठोकळे,  एड.समाधान काशिद, जयश्री झा, शीतोळे काका , सत्यविजय तांबे , महेंद्र जाधव, एड. जयवंत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांच्या कार्याचा अणि विचारांचा जागर करुन महमानवास अभिवादन केले. तसेच बाबासाहेबांनी दिलेल्या "शिका संघटीत व्हा अणि संघर्ष करा" ह्या मंत्रा प्रमाणे आता आपल्या शहराच्या विकासासाठी, आपल्या न्याय्य हक्कांसाठी आपण संघटीत होऊन संघर्ष करणे गरजेचे आहे त्यामूळे जास्तीस्त जास्त लोकांनी कॉलोनी फोरमच्या माध्यमातून आपल्या सर्वांगीण उत्कर्षासाठी संघटीत होण्याचे आवाहन लीना गरड ह्यांनी उपस्थितांना केले.
ह्यावेळी कामोठे कॉलोनी फोरमचे बापू साळुंखे, राहुल बुधे , हरीष बाबरिया,अमोल शितोळे, राहुल आग्रे, अमित घुटूकडे, प्रशांत कुंभार,प्रा. सचिन भुंबे, एस.एस. अंभोरे अणि कामोठे शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमासाठी महेंद्र जाधव, एस.एस.अंभोरे अणि सत्यविजय तांबे ह्यांनी विशेष मेहनत घेतली.
Comments