लॅपटॉप चोरी...
पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः राहत्या घरातून लॅपटॉपची चोरी झाल्याचा प्रकार खारघर वसाहतीमध्ये घडला आहे.
येथील सेक्टर 15 येथे राहणारे तेजस मिरीकर यांनी रात्री उशिरापर्यंत काम करून ते झोपले असताना त्यानंतर त्यांचे वडिल मॉर्निंग वॉकसाठी घराचा दरवाजा बंद न करता गेले असताना अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील लॅपटॉप चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार पोलस ठाण्यात करण्यात आली आहे.